माझे सध्याचे संशोधन भारतीय लहान शहरातील शहरीकरणाच्या, औद्योगिकीकरणाच्या आणि सामाजिक-आर्थिक बदलाच्या प्रक्रियांवर आहे. विशेषत: माझे पी.एच.डी संशोधन पश्चिम भारतात महाराष्ट्र राज्यातील महाड शहरावर आहे. जे शहर जातीविरोधी संघर्षाच्या आपल्या भुमिकेसाठी सर्वाधिक ओळखले जाते (विशेषत: जातीविरोधाचे आद्य प्रणेते डॉ. आंबेडकर यांच्या दोन मोठ्या आंदोलानांचे हे ठिकाण आहे) ते शहर एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून राज्य शासन पुरस्कृत औद्योगिक क्षेत्राचे ठिकाणसुद्धा आहे. पाणी आणि जमीन यांच्याबद्दलच्या संघर्षांनी महाडच्या जातीविरोधी इतिहासात आणि औद्योगिक विकासातसुद्धा महत्त्वाची भूमिका साकारली आहे. म्हणून माझ्या संशोधनात हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आहे: भारतातील सर्वात वेगाने बदलणाऱ्या प्रदेशांपैकी एका प्रदेशात एकमेकांशी जोडलेल्या सामाजिक आणि पायाभूत असमानता कशा बदलल्या?