दिल्ली 'रिज'वरील माझ्या संशोधनाची पराकाष्ठा म्हणजे माझे २०२० साली प्रसिद्ध झालेले पुस्तक 'फ्रॅक्चर्ड फॉरेस्ट, क्वार्टजाईट सिटी' (Fractured Forest, Quartzite City). (इथे प्रकरणाचा 'टीझर' उपलब्ध आहे). तथापि, प्रकल्पाच्या सुरुवातीपासून पुस्तकाच्या प्रकाशनापर्यंतच्या दशकात, ज्यांनी माझ्या 'रिज'च्या झपाटलेपणाचे समर्थन (किंवा ते सहन) केले आहे, त्यांच्या सहकार्याने, माझे 'रिज'वरचे काम अनेक दिशांना पसरले. यातील हे इतर 'रिज' प्रकल्प आहेत:
- "नॉट रिटिन इन स्टोन (Not Written in Stone)" (सचित्र लेख, दिपानी सेठबरोबर)
- "द ब्लॅक मार्केट गोज ग्रीन (The Black Market Goes Green)" (नाट्याभिनय प्रयोग)
- "दिल्ली
जलाओ आंदोलन"
(परस्परसंवादी
कालाकृती)
- "सर" (सापडलेली कविता [found poetry])
- "फ्रॅक्चर्ड फॉरेस्ट: द पॉलिटिकल इकॉलगी ऑफ द दिल्ली रिज (Fractured Forest: The Political Ecology of the Delhi Ridge)" ('इंटरकल्चरल रिसोर्सेस' [Intercultural resources] नावाच्या स्वयंसेवी संस्थेसाठीची पुस्तिका/अहवाल)