माझं पुस्तक, 'फ्रॅक्चर्ड फॉरेस्ट, क्वार्टजाईट सिटी' (Fractured Forest, Quartize City) योडा प्रेस/सेज सिलेक्ट यांच्याकडे उपलब्ध आहे.

दिल्ली 'रिज' काय आहे? या सोप्या पण फसव्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न हे पुस्तक करते. २०१० मध्ये दिल्लीला आल्यानंतर मी हा प्रश्न स्वत:ला विचारला तेव्हा मला वाटलं की उत्तर सरळ आहे. त्या वेळी अनेक पेपरांमधील लेखांनी स्पष्ट केल्याप्रमाणे हे दिल्लीचे 'हिरवे फुफ्फुस' आहेत, जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एका शहराच्या मध्यभागी संरक्षित जंगलाचा एक प्रचंड भाग आहे. पण जितका मी या प्रश्नाच्या खोलात गेलो, तितका हा प्रश्न गुंतत गेला. 'रिज' हा शब्द पर्यावरणीय महत्त्व नव्हे तर भौगोलिक अर्थ दर्शवतो आणि खरंतर दिल्लीचे संरक्षित जंगलाचे भाग मुख्यतः जुन्या अरवली पर्वतरांगांच्या अगदी शेवटच्या टोकाशी निगडित आहेत (वरील नकाशा बघा). आणि या पर्यावरणीय आणि भूशास्त्रीय अर्थाशिवाय, दिल्लीच्या दीर्घ राजकीय, आर्थिक आणि धार्मिक इतिहासामध्ये ‘रिज'ने आश्चर्यकारकपणे मोठी भूमिका साकारली आहे. मग रिजचे पाषाण आणि माती आपल्याला शहराचे नवे चित्र दाखवतात ज्याचा इतिहास अनेक शतके मागे जातो (आणि भूशास्त्रीय इतिहास कोट्यावधी वर्षे मागे जातो).

या पुस्तकामागे पाच वर्षांहून अधिक संशोधन काळ, दिल्ली राज्य अभिलेखामधील संदर्भ, सध्याच्या रिज-मधील अनेक भटकंत्या आणि इतर स्रोतांच्या विस्तृत संश्लेषणाचा आधार आहे. अशा प्रकारे 'रिज'चा स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक भूगोलाशी संबंध जोडताना रिजचा जटिल, बहुपक्षीय इतिहास मांडण्यासाठी वैयक्तिक शोेध आणि सखोल ऐतिहासिक कथा या पुस्तकात एकत्र आल्या आहेत.

क्रमिक कथा न मांडता, पुस्तक रिजवर एकात्रित झालेल्या आणि दिल्लीच्या सतत बदलणाऱ्या इतिहासाने अधोरेखित केलेल्या पाच व्यापक विषयांवर आधारित आहे: भूशास्त्रीय; पर्यावरणीय; राजकीय; आर्थिक; आणि अध्यात्मिक. प्रत्येक प्रकरण एक एका विषयावर बेतलेले आहे, जे दिल्लीच्या इतिहासाच्या दीर्घ कालावधीतील एका विषयाचे अनुसरण करते आणि हा विषय शहराच्या इतिहासात निर्णायक घटक बनतो तेव्हाचे वर्णन करते.

एकदा फ्रेन्च तत्त्वज्ञ ऑंरी लफेब्र यांनी सामाजिक जागेची तुलना आच्छादित थर असलेल्या आणि एकमेकांवर ओघळणाऱ्या ढलप्यांसारख्या पेस्ट्रीशी केली. अशा प्रकारे आपल्याला माहित असलेले दिल्ली शहर घडण्यासाठी अगदी स्थानिक आणि जागतिक प्रक्रिया स्वीकारणारे दिल्लीच्या इतिहासाचे थर एकत्र मिसळले.

पुस्तकाची प्रकरणे आणि त्यांच्याबरोबर पुस्तकासाठी दिपानी सेठ यांनी तयार केलेली सुंदर चित्रे बघा:

आत्तापर्यंत पुस्तक फक्त इंग्रजीत उपलब्ध आहे. जर मराठी (किंवा हिंदी) अनुवादकांना किंवा प्रकाशकांना पुस्तकात रस असेल, तर कृपया मला संपर्क करा!