माझ्या मराठी अभ्यासाचा एक भाग म्हणून मी काही लेख, पुस्तिका आणि भाषणे (आणि हे संकेतस्थळ!) यांचा अनुवाद करतो आहे. गेल्या काही महिन्यांत मी मुख्यतः ब्लॅक पँथर पार्टी याच्यासंबंधित साहित्याचा अनुवाद केला आहे.

ब्लॅक पँथर पार्टी: काही कागदपत्रे आणि भाषणे

१९६६ साली अमेरिकेत ब्लॅक पँथर पार्टीची स्थापना झाली. ही क्रांतिकारक संस्था मुख्यतः दलित पँथरसाठी प्रेरणा म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाती. ब्लॅक पँथर पार्टी नेमकी कशी होती? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी काही कागदपत्रे आणि भाषणांचा इंग्रजीतून मराठीत अनुवाद केला. हे बघण्यासाठी खालील लिन्क्सवर क्लिक करा.