'सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज' (सी. एस. डी. एस.)-मध्ये सराईच्या 'सिटी अॅज स्टुडिओ २' प्रदर्शनाचा भाग म्हणून मी सरपण गोळा करायला रिजला एका रात्री सहल आयोजित केली. नंतर आम्ही सी. एस. डी. एस-च्या अंगणात प्रदर्शनाच्या हिवाळी रात्री गरमीसाठी सरपणाने शेकोटी पेटवली. या अनुभवातून आम्हाला कल्पना आली की जसजसे रिजवरील चरण्याची जागा आणि लाकडाच्या सत्रोताचे रूपांतर संरक्षित वन क्षेत्रात झाले आहे, तसतसा रिजवरील पोलिस बंदेबस्त वाढला आहे. जागेचे पारंपारिक वापर उदा. सरपण गोळा करणे हे बेकायदेशीर झाले आहेत. प्रदर्शनासाठी बनवलेल्या पाट्या (वरील) दिल्ली विकास प्राधिकरणाच्या रिजवर सर्वत्र असलेल्या पाट्यांवर (खालील) आधारित आहेत.