७०-पानी पुस्तिका 'फ्रॅक्चर्ड फॉरेस्ट: द पॉलिटिकल इकॉलगी ऑफ द दिल्ली रिज' माझ्या 'इंटरकल्चरल रिसोर्सेस' (आई. सी. आर.) नावाच्या स्वयंसेवी संस्थेसाठी केलेल्या कामावरून उदयास आली. आई. सी. आर.ने ही पुस्तिका प्रसिद्ध केली. हे संशोधन आणि हा अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी मी आई. सी. आर.-च्या पी. टी. जॉर्ज यांचे मनापासून आभार मानतो. पुस्तिकेत, थोडक्या ऐतिहासिक आढाव्यानंतर, रिजवरील सध्याच्या संघर्षाचे कायदेशीर, पर्यावरणीय आणि सामाजिक पैलू मांडले आहेत आणि समाज सुधाराणाच्या दृष्टिकोनातून दिल्लीच्या हिरव्यागार क्षेत्राचे संरक्षण करणे आणि ते विस्तृत करणे, यावर काही मार्ग सुचवले आहेत.