'९२' नावाची कार्यशाळा दोनदा झाली, एकदा १६ फेब्रुवारी २०१७ रोजी आणि पुन्हा, विस्तारित स्वरूपात, ११ मार्च २०१७ रोजी. दोन्ही कार्यशाळा स्टुटगार्ट, जर्मनीमधील 'अकॅडमी श्लॉस सॉलिट्यूड'मधील 'शॉर्ट फेस्टिवल फॉर बायोग्रफीज ॲंड द प्रोडक्शन ऑफ स्पेस'चा भाग होत्या. या कार्यशाळा '९२' नंबरच्या बसमध्ये झाल्या, जी डाउनटाउन स्टुटगार्टपासून श्लॉस सॉलिटूडवरून लेआनबर्ग शहराला जाते, मग परत वळते आणि शेवटी स्टुटगार्टला पुन्हा पोहोचते. या कार्यशाळांमध्ये सहभागींनी या ९०-मिनिटांच्या प्रवासाचे विविध अनुभव घेतले.
थॉमस क्राऊली आणि दिपानी सेठ यांनी या कार्यशाळेचे नेतृत्व केले. सहभागींना या प्रवासावरील शहरी आणि उपशहरी जागांची पाहणी करण्याची साधने देणे, हा या कार्यशाळेचा एकंदर हेतू होता. कविता, वृत्तबद्ध लेखन (contraint-based writing) आणि विविध प्रकारचे कॉमिक्स यांतून प्रेरित झालेला हा कार्यशाळा अंतर्गत अनुभव आणि बाह्य जागा यांच्या छेदबिंदूचा नकाशा काढण्यासाठी मजकूर आणि चित्रे एकत्र करण्याचा प्रयत्न होता.
कार्यशाळेचे संपूर्ण वर्णन इथे इंग्रजित उपलब्ध आहे. खाली कार्यशाळेची काही चित्रे आहेत.