प्रकल्पाचे थोडक्यात वर्णन
‘एक्साईट बाईक'-मध्ये एक व्यक्ती स्थिर सायकलीवर पेडल करतो, आणि सायकल संगीत आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी मल्टीमीडिया वाद्य बनते. रंग ओळखणारे तंत्रज्ञान असलेला कॅमेरा व्यक्तीच्या पायावर असलेल्या गुलाबी फीतीच्या तुकड्याचे मापन करतो आणि पेडलचा वेग मोजतो. मी तयार केलेल्या कंप्यूटर प्रोग्रॅमसाठी हा वेग मुख्य इनपुट होता (वरील चित्रात 'मॅक्स/एम.एस.पी./जिटर' नावाच्या प्रोग्रॅमिंग भाषेचे 'स्वत: करा' [DIY] हे सौंदर्य दाखवले आहे). सायकलीच्या हँडलला जोडलेल्या व्हिडिओ गेम नियंत्रकाने वापरकर्ता वेगवेगळे पर्याय निवडू शकतो:
१. ज्यूकबॉक्स: पेडलच्या वेगावर आधारित, संथ, मध्यम किंवा दृत गाणी ऐका
२. आपले गाणे बनवा: आपला ठेका तयार करा, आधी ड्रम्ज, नंतर बास, नंतर सिंथ
३. सायकल सुरक्षा: सायकल शर्यतीच्या व्हिडिओ क्लिपवर आधारित सोपा व्हिडिओ गेम खेळा