प्रकल्प वर्णन


या परस्परसंवादी कालाकृतीत आठ कंप्यूटर असतात. प्रत्येक कंप्यूटर एकाच नेटवर्कला जोडलेला असतो आणि प्रत्येक कंप्यूटरवर एकच स्क्रीन असतो, ज्यावर आठ तत्त्वज्ञांचे चित्र आणि एक नियंत्रण पॅनेल आहे (खाली बघा). मग जास्तीत जास्त आठ लोक संभषणात सहभागी होऊ शकतात. ते कंप्यूटर निवडतात, तत्त्वज्ञ निवडतात आणि या तत्त्वज्ञाला बोलते करतात (माझ्या मुलाखतींच्या ध्वनिमुद्रणाच्या सहाय्याने). मग हे तत्त्वज्ञ विचित्र संवाद सुरू करू शकतात. त्यांच्या संवादाची उपशीर्षके दिसतात. सहभागी लोक ऑडिओ आणि व्हिडिओ इफेक्ट्स वापरू शकतात व संभषणाचा स्वर आणि शैली सरळ ठेवू शकतात किंवा खूप वेगवेगळे प्रायोग करू शकतात. आपापले विश्व निर्माण करणे, हे सहभागी लोकांवर अवलंबून असते.

अधिक तपशीलवार वर्णन इथे इंग्रजीत उपलब्ध आहे.