हा सचित्र लेख दिल्लीतील एकल-स्क्रीन चित्रपटगृहांच्या भविष्याबद्दल एक चिंतन आहे. मल्टिप्लेक्सच्या आक्रमणामुळे, अनेक एकल-स्क्रीन चित्रपटगृह दुरलक्षित आहेत आणि ते नेहमी जमीनीच्या वादात अडकलेले असतात. (वरील चित्र प्रत्यक्षात पुण्याचे आहे पण यावरून ही बाब लक्षात येईल.) या लेखात अशी कल्पना केली आहे की चित्रपाटगृह आणि तथाकथित 'आयटम गर्ल' यांचे सारखेच भाग्य आहे. जेव्हा ते तरूण असतात तेव्हा लोक त्यांच्याकडे खूप आकर्षित होतात, पण जेव्हा ते जुने होतात तेव्हा ते निष्काळजीपणाने टाकून दिले जातात. संगीत आणि गीत: थॉमस क्राऊली. चित्रे: दिपानी सेठ.