प्रस्तावना

(मूळ इंग्रजी आवृत्ती इथे आणि इथे उपलब्ध आहे)

कदाचित काळा इतिहास न जाणणाऱ्या बिचाऱ्यांना वाटेल की स्वसंरक्षणासाठी असलेल्या ब्लॅक पँथर पक्षाच्या धारणा आणि आकांक्षा अवास्तव आहेत. काळ्या लोकांना जगण्यासाठी हे दहा मुद्दे पूर्णपणे आवश्यक आहेत. 'या गोष्टींना वेळ लागतो' हे दंगा घडवणारे शब्द आम्ही गेली ४०० वर्षे ऐकत आलो आहोत. ब्लॅक पँथर पक्षाला माहीत आहे की काळ्या लोकांना काय पाहिजे आणि त्यांच्या गरजा काय आहे. काळ्यांचे ऐक्य आणि स्वसंरक्षण या मागण्या प्रत्यक्षात आणतील.


दहा मुद्दे


१. आम्हाला मुक्ती पाहिजे. आम्हाला आमच्या काळ्या समाजाचे नशीब बदलण्याची निश्चित टाकत पाहिजे पाहिजे.

आम्हाला वाटते की जोपर्यंत काळे लोक आपले नशीब निश्चित करू शकत नाहीत तोपर्यंत मुक्ती मिळणार नाही.


२. आम्हाला आमच्या लोकांसाठी पूर्ण रोजगार पाहिजे.

आम्हाला वाटते की प्रत्येक माणसाला रोजगार किंवा उत्पन्नाची हमी देण्याची जबाबदारी आणि बंधन केंद्र सरकारचे आहे. आम्हाला वाटते की अमेरिकेच्या गोऱ्या व्यापाऱ्यांनी पूर्ण रोजगार दिला नाही तर व्यापाऱ्यांकडून उत्पादनाची साधने परत घ्यावीत आणि समाजाला द्यावीत म्हणजे आमच्या समाजाचे लोक स्वत: ला संघटित करतील, पूर्ण रोजगार मिळवतील आणि त्यांचा जीवनमान उंचावेल.


३. आम्हाला भांडवलदारांकडून आमच्या समाजाच्या होणाऱ्या चोरीवर विराम पाहिजे.

आम्हाला वाटते की या वंशद्वेषी सरकारने आमची लूट केली आहे आणि आता आम्ही चाळीस एकर जमीन आणि दोन खेचरे यांच्या थकीत कर्जाची मागणी करत आहोत. १०० वर्षांपूर्वी गुलामांचे श्रम आणि काळ्या लोकांची सामूहिक हत्या यासाठी पुनर्वसन म्हणून चाळीस एकर आणि दोन खेचरे देण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही हे देय रोख पैशांच्या रुपात स्वीकारू आणि आमच्या अनेक समाजांना त्याचे वितरण करू. आता यहुद्यांच्या नरसंहारासाठी पुनर्वसन म्हणून जर्मन लोक इस्रायलमधील याहुद्यांना मदत करत आहेत. जर्मन लोकांनी साठ लाख यहुद्यांची हत्या केली. अमेरिकेच्या वंशद्वेषी लोकांनी पाच कोटींपेक्षा जास्त काळ्या लोकांच्या कत्तलीत भाग घेतला आहे म्हणून आम्हाला वाटते की आम्ही जी मागणी करत आहोत ती माफक आहे.


४. आम्हाला मानवांच्या रक्षणासाठी योग्य व पुरेशी गृहे पाहिजे आहेत.

आमचा वाटते की गोरे जमीनदारांनी आमच्या काळ्या समाजाला पुरेशी गृहे दिली नाहीत तर गृहे आणि जमीन यांना सहकारी करावे जेणेकरून सरकारी मदतीने आमचा समाज आपल्या लोकांसाठी पुरेशी गृहे निर्माण करू शकतो.


५. आम्हाला आमच्या लोकांसाठी या अवनती होत जाणाऱ्या आमेरिकेच्या समाजाचे खरे स्वरूप उघडकीस आणणारे शिक्षण पाहिजे. आम्हाला आमचा खरा इतिहास आणि सद्य समाजातील आमची भूमिका याबद्दलचे शिक्षण पाहिजे.

आमच्या लोकांना स्वत: चे ज्ञान मिळवून देणाऱ्या शौक्षणिक व्यवस्थेवर आमचा विशवास आहे. जर एखाद्या माणसाला स्वत:चे आणि समाजातील आणि जगामधील त्याच्या भूमिकेचे ज्ञान नसेल तर त्याला इतर कोणत्याही गोष्टीशी आपला संबंध जोडण्याची फारशी संधी नाही.


६. आम्हाला सर्व काळ्या पुरुषांना लष्करी सेवेतून सूट पाहिजे.

आम्हाला वाटते की काळ्या लोकांना लष्करी सेवेत लढायला आणि आपल्या संरक्षण न करणाऱ्या वंशद्वेषी सरकारचा बचाव करायला भाग पाडता कामा नये. आम्ही लढाई करणार नाही आणि ज्या लोकांना अमेरिकेचे गोरे वंशद्वेषी सरकार बळी घेते (काळे लोकांसारखे) त्या गोरेतर लोकांना आम्ही मारणार नाही. आम्ही कोणत्याही प्रकारे वंशद्वेषी पोलिसांपासून आणि वंशद्वेषी सैन्यापासून आमचे रक्षण करू.


७. आम्हाला पोलिसांची क्रूरता आणि काळ्या लोकांची हत्या यांपासून त्वरित मुक्ती पाहिजे.

आम्हाला वाटते की आमच्या काळ्या समाजाला वंशद्वेषी पोलिसी अत्याचार आणि क्रूरतेपासून बचावासाठी समर्पित असे स्वत:च्या काळ्या संरक्षण गटांची निर्मिती करून आम्ही पोलिसांची क्रूरता संपवू शकतो. अमेरिकेच्या घटनेतील दुसरी दुरुस्ती शस्त्रे धारण करण्याचा अधिकार देते. म्हणून आम्हाला वाटते की सगळ्या काळ्या लोकांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्रे धारण करावीत.


८. आम्हाला केंद्रीय, राज्य, जिल्हा आणि शहर कारागृहात आणि तुरूंगात ठेवलेल्या सर्व काळ्या माणसांची मुक्ती पाहिजे.

आम्हाला वाटते की सर्व काळ्या लोकांना अनेक कारागृह आणि तुरूंगातून सोडण्यात यावे कारण त्यांना योग्य आणि निःपक्षपाती न्याय मिळाला नाही.


९. अमेरिकेच्या घटनेत परिभाषित केल्याप्रमाणे आम्हाला असे पाहिजे की जेव्हा काळ्या लोकांना सुनावणीसाठी आणले जाते तेव्हा त्यांच्यासारख्या लोकांच्या किंवा आमच्या काळ्या समाजाच्या लोकांच्या ज्यूरीकडून त्यांच्यावर न्यायालयात खटला चालवला जावा.

आम्हाला वाटते की न्यायालायांनी घटनेनुसार चालावे जेणेकरून काळ्या लोकांना योग्य न्याय मिळेल. अमेरिकेच्या घटनेतील चौदावी दुरुस्ती माणसाला त्याच्या बरोबरच्या माणसांच्या गटाकाडून खटला चालवला जाण्याचा अधिकार देते. बरोबरचा मनुष्य म्हणजे सम आर्थिक, सामाजिक, धार्मिक, भौगोलिक, पर्यावरणीय, ऐतिहासिक आणि वांशिक पार्श्वभूमीची व्यक्ती. हे करण्यासाठी न्यायालयाला काळ्या आरोपींसाठी काळ्या सामाजातील ज्यूरी निवडावे लागतील. पूर्ण गोऱ्या लोकांच्या ज्यूरीकडून आमच्यावर खटले चालवले गेले (आणि चालवले जात आहेत). अशा ज्यूरीला काळ्या समाजाचा 'सामान्या बुद्धिमत्तेचा माणूस’ याविषयी काहीही समजत नाही.


१०. आम्हाला जमीन, अन्न, छत्र, शिक्षण, वस्त्र, न्याय आणि शांती पाहिजे.*

मानवी घडामोडींदरम्यान जेव्हा एक समाज त्याला दुसऱ्या समाजाशी जोडणारा राजकीय संबंध तोडतो आणि त्याला पृथ्वीवरील सत्तांपैकी एका सत्तेची स्वतंत्र आणि समान भूमिका घेणे (ज्यासाठी निसर्गाचे कायदे आणि निसर्गाचे देव त्यांना पात्र ठरवतात) आवश्यक होते, तेव्हा मानव जातीच्या मतांच्या आदरासाठी त्यांना विभक्त करण्यास प्रवृत्त करणारी कारणे त्यांनी जाहीर करावीत.

आम्ही हे सत्य स्वयंसिद्ध मानतो की, सर्व मानव समान घडवलेले आहेत; त्यांचा ईश्वर त्यांना काही न हिरावून घेता येणारे अधिकार देतो; आणि या अधिकारांपैकी, जीवन, स्वातंत्र्य, आणि आनंद मिळवण्याचे अधिकार आहेत. म्हणून हे अधिकार राखण्यासाठी लोकांचे सरकार स्थापन केले जाते आणि शासित संमतीने या सरकारांची न्यायिक शक्ती मिळवली जाते; जेव्हा कोणत्याही प्रकारचे सरकार या हेतूविषयी विध्वंसक होते तेव्हा ते बदलणे किंवा ते सरकार पाडून नवे सरकार स्थापन करणे, हा लोकांचा हक्क आहे. नव्या सरकारची तत्त्वे आणि सत्तेची रचना आशा आधारावर असावी जेणेकरून लोकांची सुरक्षितता आणि हित सांभाळले जाईल. खरोखर, विवेकबुद्धी सूचित करते की दीर्घ-प्रस्थापित सरकारे किरकोळ आणि क्षणिक कारणांसाठी बदलू नयेत. त्यानुसार सर्व अनुभवांतून आपल्याला दिसते की जेव्हा वाईट गोष्टी सहन करण्यायोग्य असतात तेव्हा सवयीचे असणारे रुप रद्द करण्याने मानव जात स्वत: ला सुधारण्यापेक्षा गोष्टी सहन करत राहण्याची अधिक शक्यता असते. परंतु जेव्हा सतत एकाच ध्येयाचा पाठपुरावा करणारे सरकार सत्ता बळकावून, अत्याचार करून लोकांना निरपेक्ष हुकूमशाहीखाली दडपण्याची भूमिका स्पष्ट करते तेव्हा या प्रकारच्या सरकाराला काढून टाकणे आणि आपल्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी नवीन रक्षक निर्माण करणे, हा लोकांचा हक्क आणि कर्तव्य आहे.


*ब्लॅक पँथर पार्टीने पुढील उताऱ्यात अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेतून उद्धृत केले.