(मूळ
इंग्रजी आवृत्ती इथे
उपलब्ध आहे)
संपूर्ण
वंशद्वेषी अमेरिकेत प्रत्येक
सदस्याला पर्टीचे कार्यशील
सदस्य म्हणून या नियमांचे
पालन करावे लागेल.
केंद्रीय
समिती सदस्य,
केंद्रीय
कर्मचारी,
स्थानिक
कर्मचारी,
आणि
ब्लॅक पँथर पार्टीच्या
राष्ट्रीय,
राज्य
आणि स्थानिक नेतृत्वाखाली
असलेले प्रमुख,
हे
नियम लागू करतील.
जिथे
ब्लॅक पँथर पार्टीचे नियम
मोडले जातील तिथे राष्ट्रीय,
राज्य
आणि स्थानिक समिती आणि कर्मचारी
यांच्या निर्णयानुसार या
नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल
शिक्षेसाठी आवश्यक असलेल्या
निलंबनाचा काळ किंवा अन्य
शिस्तभंग यांवर निर्णय घेतला
जाईल.
पर्टीच्या
प्रत्येक सदस्याला हे नियम
शब्दश:
पाठ
असावे लागतील आणि दररोज पाळावे
लागतील.
प्रत्येक
सदस्याला या नियमांचे कोणतेही
उल्लंघन त्यांच्या नेत्यांना
कळवावे लागेल.
नाहीतर
ते प्रतिक्रांतिकारक मानले
जातील आणि त्यांना ब्लॅक पँथर
पार्टीतून निलंबित केले जाईल.
हे
नियम आहेत:
१.
पार्टीचे
काम करताना पार्टीच्या सदस्याकडे
आमली पदार्थ किंवा गांजा असता
कामा नये.
२.
पार्टीचा
कोणताही सदस्य आमली पदार्थाचे
सेवन करताना आढळला तर त्याला
या पार्टीतून हद्दपार केले
जाईल.
३.
पार्टीचे
रोजचे काम करताना पार्टी
सदस्याने नशेत असता कामा नये.
४.
कार्यालयीन
कामकाज,
ब्लॅक
पँथर पार्टीची सर्वसाधारण
सभा,
आणि
इतर बैठका यांच्यासंबंधित
नियमांचे पार्टी सदस्याने
उल्लंघन करू नये.
५.
पार्टी
सदस्याने कोणत्याही प्रकारचे
शस्त्र अनावश्यक किंवा अपघाती
मार्गाने वापरू नये,
कोणावरही
चालवू नये,
किंवा
कोणावरही उगारू नये.
६.
काळ्यांची
मुक्ती सेना (ब्लॅक
लिबरेशन आर्मी)
याशिवय
पार्टी सदस्याने इतर सैन्य
दलात भरती होऊ नये.
७.
दारू,
गांजा
किंवा आमली पदार्थांच्या
नशेत असताना पार्टी सदस्याने
शस्त्र बाळगू नये.
८.
पार्टीच्या
इतर सदस्यांवर किंवा कोणत्याही
काळ्या व्यक्तीवर पार्टीच्या
सदस्याने गुन्हा करू नये आणि
या लोकांकडून काहीही (सुई
किंवा धाग्याचा एक तुकडाही)
चोरी
करु नये.
९.
अटक
झाल्यास ब्लॅक पँथर पार्टी
सदस्याने फक्त नाव आणि पत्ता
द्यावे आणि कुठेही सही करू
नये.
पार्टीच्या
प्रत्येक सदस्याला कायदेशीर
प्रथमोपचार समजावे लागतील.
१०.
पर्टीच्या
प्रत्येक सदस्याला ब्लॅक
पँथर पार्टीच्या दहा मुद्द्यांची
मूलतत्त्वे आणि उपक्रम माहित
असावे लागतील आणि समजून घ्यावे
लागतील.
११.
पार्टीचे
संपर्क राष्ट्रीय आणि स्थानिक
असावेत.
१२.
प्रत्येक
सदस्याला '१०-१०-१०'
या
नावाचे उपक्रम माहित असावे
लागतील आणि समजून घ्यावे
लागतील.
१३.
अर्थ
मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रात
सगळ्या वित्त अधिकाऱ्यांनी
काम करावे.
१४.
प्रत्येकाने
दैनंदिन कामाचा अहवाल सादर
करावा.
१५.
प्रत्येक
उपविभागीय नेत्याने,
विभागीय
नेत्याने,
लेफ्टनंटाने
आणि प्रमुखाने दैनंदिन कामाचा
अहवाल सादर करावा.
१६.
सगळे
पॅंथरांनी शस्त्र बरोबर
चालवायला आणि देखभाल करायला
शिकावे.
१७.
एखाद्या
सदस्याला पार्टीतून काढून
टाकणाऱ्या नेत्यांनी याबद्दलची
माहिती वृत्तपत्राच्या
संपादकाला सादर करावी जेणेकरून
ती वृत्तपत्रात प्रसिद्ध
होईल आणि सर्व शाखा आणि विभागांना
याबद्दल माहिती मिळेल.
१८.
सर्वसाधारण
सभासद होण्यासाठी राजकीय
शिक्षण वर्ग अनिवार्य आहेत.
१९.
फक्त
संबंधित कार्यालयांमध्ये
त्याच दिवशी नियुक्त केलेल्या
कार्यालय कर्मचारींनी तिथे
असावे.
प्रमुख,
विभाग
नेते,
इत्यादी
या सारख्या बाकीच्या लोकांनी
पेपर विकावे आणि समाजात राजकीय
काम करावे.
२०.
संपर्क:
सगळ्या
विभागांनी साप्ताहिक लेखी
अहवाल राष्ट्रीय मुख्यालयाला
सादर करावा.
२१.
सगळ्या
शाखांमध्ये प्रथमोपचार सुविधा
आणि/किंवा
वैद्यकीय कर्मचारी असावेत.
२२.
ब्लॅक
पँथर पार्टीच्या सर्व विभाग,
शाखा
आणि घटक यांनी मासिक आर्थिक
अहवाल वित्त मंत्रालयाला आणि
केंद्रीय समितीला सादर करावा.
२३.
बदलणाऱ्या
राजकीय परिस्थितीबद्दल माहिती
ठेवण्यासाठी नेतेपदावर
असलेल्या सर्व व्यक्तींनी
दररोज किमान दोन तास वाचन
करावे.
२४.
प्रत्येक
विभाग आणि शाखांनी राष्ट्रीय
मुख्यालयाशी संपर्क केल्याशिवाय
कोणत्याही सरकारी संस्थेकडून
अनुदान,
दारिद्र्य
निधी,
पैसा
किंवा कोणतीही इतर मदत स्वीकारू
नये.
२५.
सर्व
विभागांनी ब्लॅक पँथर पार्टीच्या
केंद्रीय समितीने मांडलेल्या
धोरण आणि विचारसरणीचे पालन
करावे.
२६.
सर्व
शाखांनी साप्ताहिक लेखी अहवाल
त्यांच्या संबंधित विभागांना
सादर करावेत.
८
लक्ष देण्याचे मुद्दे
१.
नम्रपणे
बोला
२.
जे
तुम्ही विकत घ्याल त्यासाठी
वाजवी किंमत द्या.
३.
जे
तुम्ही उधार घ्याल ते परत करा.
४.
तुमच्या
हातून जे नुकसान होईल त्याची
नुकसान भरपाई करा.
५.
लोकांना
मारू नका किंवा शिव्या देऊ
नका.
६.
गरीब,
पीडित
जनतेची मालमत्ता किंवा पिके
यांचे नुकसान करू नका.
७.
महिलांशी
गैरवर्तन करू नका.
८.
जर
आपल्याला कोणालाही पकडून
ठेवावे लागले तर त्यांच्याशी
वाईट वागू नका.
शिस्तीचे
३ मुख्य नियम
१.
कोणतीही
क्रिया करताना आज्ञा पाळा.
२.
गरीब
आणि पीडित जनतेकडून सुई किंवा
धाग्याचा एक तुकडाही घेऊ नका.
३.
हल्ला
करणाऱ्या शत्रूकडून हस्तगत
केलेल्या वस्तू सोपवा.