‘जूडस अँड द ब्लॅक मसीहा' या अलीकडच्या हॉलीवूड चित्रपटाने ब्लॅक पँथर पार्टीचे पुढारी फ्रेड हॅम्पटन यांच्याकडे लक्ष वेधले. त्यांनी ब्लॅक पँथर पार्टीच्या इलिनोई राज्य शाखेचे अध्यक्षपद भूषवले आणि शिकागो शहरात सर्व वांशिक स्तरावरील संघटनात्मक कामासाठी ते परिचित होते. १९६९ साली एक प्रकारच्या पोलिस चकमकीमध्ये हॅम्पटन यांची हत्या झाली. या छाप्यामध्ये एफ. बी. आय.ने महत्त्वाची भूमिका साकारली, हे नंतर उघड झाले. त्यांच्या उल्लेखनीय नेतृत्व कौशल्यामुळे आणि सर्व वांशिक स्तरावरील क्रांतीकारी आणि पुरोगामी संघटना एकत्र आणण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे, हॅम्पटन खूप 'धोकादायक' आहेत, असे एफ. बी. आयने मानले.
त्यांच्या हत्येच्या आधीच्या वर्षात, हॅम्पटन यांच्यावर ७१ डॉलर किमतीचे आईस्क्रीम चोरून ते मुलांना वाटण्याचा आरोप होता. हा आरोप ब्लॅक पँथर पक्षाच्या कामात व्यत्यय आणण्याचा सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, असे अनेक लोकांना वाटले. या आरोपासंबंधित वास्तविक सुनावणीपुर्वी स्वत: चा बचाव करण्यासाठी आणि वंशद्वेष, भांडवलशाही आणि पोलिस या विषयांवर त्यांचा दृष्टिकोन सांगण्यासाठी हॅम्पटन यांनी सराव सुनावणी आयोजित केली. कुक काऊंटी इलिनोई राज्याचे वकील एडवर्ड हॅन्रहॅन, शिकागो महापौर रिचर्ड जे. डेली आणि राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यासारखे उच्चस्तरीय राजकारणी हे सामान्य लोकांचे खरे शत्रू असल्याचे हॅम्पटन यांनी सांगितले.
सराव सुनावणीच्या फुटेजचा एक भाग खाली आहे.
या
मुलाखतीत आयोजन कार्याच्या
आणि सामाजिक परिवर्तनाच्या
ब्लॅक पँथर पार्टीच्या
दृष्टीकोनाबद्दल हॅम्पटन
बोलले आहेत.
उतारा
भाषण
१
कशामुळे
त्यांना राग येतो? त्यांना
राग येतो कारण त्यांच्यासमोर
काळे लोक आणि गोरे गरीब लोक
आणि लाल गरीब लोक आणि पोर्टो
रिकन गरीब लोक आणि लॅटिन अमेरिकन
गरीब लोक, सर्व
वंशातील गरीब लोक, या
सर्व लोकांना वंशद्वेष आधारित
चळवळीचा नाद लागला होता.
पण ब्लॅक पँथर
पार्टी उभी राहिली आणि म्हणाली
की, कोणाचेही
म्हणणे काहीही असो,
आम्हाला वाटत
नाही की आगीने आगीशी लढावं,
आम्हाला वाटतं
की आगीशी पाण्याने लढावं.
हो,
आम्ही वंशद्वेषाशी
वंशद्वेषाने लढणार नाही पण
आम्ही एकतेने यांच्याशी लढणार
आहोत. आम्ही
म्हणतो की आम्ही काळ्या
भांडवलशाहीने भांडवलशाहीशी
लढणार नाही पण आम्ही समाजवादाने
यांच्याशी लढणार आहोत.
आम्ही उभे
राहिलो आणि म्हणालो की आम्ही
प्रतिगामी डुकरांशी [पोलिसांसाठी
शिवी] आणि
हॅन्रहॅन यासारख्या राज्याच्या
वकीलांशी इतर कोणत्याही
प्रतिक्रियेने लढणार नाही.
आम्ही सगळे
लोक एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय
सर्वहारा क्रांती करून त्यांच्या
प्रतिक्रियेशी लढणार आहोत.
[वाह,
वाह]
असे
म्हणायचे आहे, लोकांना
सर्व शक्ती मिळो.
असे
म्हणायचे आहे की तुमचा रंग
कोणताही असला तरी फक्त दोन
वर्ग असतील. आणि
म्हणजे इथे एक वर्ग आहे आणि
तिथे एक वर्ग आहे. या
वर्गाने दुसऱ्या वर्गाला
त्याच्या खांद्यावरून उतरवायला
कधीच काही केले नाही आणि याचे
कारण असे आहे की हे खालचे आहे,
हे वरचे आहे;
हे दडपलेले
आणि हे दडपवणारे; हे
शोषित आणि हे शेषण करणारे.
आणि या वर्गातील
लोकांनी स्वत: ची
विभागणी केली आहे. ते
म्हणतात की मी काळा आहे आणि
मी गोऱ्या लोकांचा तिरस्कार
करतो. मी
गोरा आहे आणि मी काळ्या लोकांचा
तिरस्कार करतो. मी
लॅटिन अमेरिकेन आहे आणि मी
'हिलबिली'
लोकांचा
तिरस्कार करतो. मी
हिलबिली आहे आणि मी आदिवासींचा
तिरस्कार करतो. तर
आपण एकमेकांशी लढत आहोत.
आणि
तुम्ही इथे डुकरांची साक्ष
ऐकली आहे. तुम्हाला
ठाऊक आहे की सर्व रंगांचे
डुक्कर आहेत. गोरी
डुकरं आहेत, काळी
डुकरं आहेत, गोरी
आणि काळी डुकरंही आहेत.
ते अशा प्रकारच्या
वेडेपणाचा प्रचार करतात की
मूर्ख हॅन्रहॅन स्वत:
इथे असता तर
त्यानेही प्रचार केला असता.
आणि
का?
कारण
त्यांची इच्छा आहे की तुम्हाला
वाटत रहावं की मी तुमचा शत्रू
आहे, आणि
इतर कोणताही काळा माणूस किंवा
डोक्यावर खूप केस असलेला किंवा
चेहऱ्यावर खूप केस असलेला
माणूसही तुमचा शतरू आहे,
असं तुम्हाला
भासवायचं आहे.
का?
कारण
जर तुम्ही फक्त एका मिनिटासाठी
त्याकडे दुर्लक्ष केलं किंवा
बघितलं नाही आणि वंशद्वेषाचा
प्रश्न दूर फेकला आणि थोडा
विचार केला तर तुम्हाला हल्ला
करायला कोणीच मिळणार नाही,
हॅन्रहॅनशिवाय,
डेलीशिवाय
आणि 'ट्रिकी
डिकी निक्सन'शिवाय.
तुम्ही
योग्य निर्णय घेतल्यास जगातील
दडपलेल्या लोकांना पूर्ण
समाधान मिळेल. मला
माहित आहे की तुम्ही निर्दोष
निर्णय देणार आहात.
धन्यवाद.
भाषण
२
आपण
रोज बाहेर पडतो आणि शिकवतो.
लोक उदाहरणाने
शिकत असतात. मला
वाटतं की ही बाब निर्विवाद
आहे. मला
वाटतं की जेव्हा ह्यूई पी.
न्यूटन म्हणाले
की मुळात लोक निरीक्षणाने
आणि सहभागाने शिकत असतात
तेव्हा सगळ्यांनी हे लक्षात
घेतलं. तर
ही अगदी सोपी गोष्ट आहे की जर
ते निरीक्षणाने आणि सहभागाने
शिकतात तर आपल्याला लिहण्यापेक्षा
कृती करायला पाहिजे. आणि
मला वाटतं की ब्लॅक पँथर पार्टी
असंच करते आहे.
आपण
मुलांसाठी विनामूल्य न्याहरी
योजनेबद्दल बोललो नाही,
आपल्याकडे
हे आहेच. शिकागोमध्ये
किती मुलांना आम्ही अन्न देऊ
इच्छितो असं आम्ही तुम्हाला
सांगत नाही आहोत. प्रत्येक
आठवड्यात आम्ही शीकागोमध्ये
आधीच ३००० ते ४००० मुलांना
आणि सर्व देशभर कित्येक मुलांना
(नेमका
आकडा मला माहित नाही)
अन्न देतो.
वैद्यकीय
सेवेची गरज असलेल्या लोकांना
विनामूल्य सेवा देण्याचा
विचार करू लागण्याबद्दल बोलत
नाही आहोत. आम्ही
शिकागो शहरात तीन आठवड्यांपेक्षा
कमी कालावधीत विनामूल्य आरोग्य
चिकित्सालय उघडले.
लोकांना
या प्रकारची उदाहरणे लक्षात
येतात. द
ट्रिब्यून, द
डेली न्यूज, द
सन टईम्स या सारख्या मूर्खांचे
चमचे असलेली प्रस्थापित
माध्यमे आमच्या कार्याचे
महत्त्व कमी करू शकत नाहीत
कारण उदाहरणे इथेच आहेत,
ती ठोस आहेत.
जुन्या
म्हणीप्रमाणे एक चित्र हजार
शब्दांचे असते आणि जे तुम्ही
बघता त्यावर तुम्हाला विश्वास
ठेवावा लागतो. योजना
आहेत. लोकांनी
त्या बघाव्या. आणि
फक्त डोळे मिटलेले आणि
ज्ञानाविरूद्ध लढणारे लोक
त्या बघत नाहीत. आणि
ज्ञानाविरूद्ध लढणारे लोक
कधीही क्रांतीला उपयुक्त
ठरणार नाहीत.