ब्लॅक पँथर पार्टीच्या पार्श्वभूमीची माहिती

पुढील माहिती blackpanther.org या संकेतस्थळावरून घेतली आहे. आता हे संकेतस्थळ उपलब्ध नाही पण त्याचे संग्रहित रूप इथे उपलब्ध आहे. 'डॉ. ह्यूई पी. न्यूटन फाऊंडेशन' या नावाच्या संस्थेने हे संकेतस्थळ तयार केले. त्यामुळे न्यूटन यांचे पार्टीतील महत्त्व आणि त्यांचा दृष्टिकोन यावर संकेतस्थळाची माहिती मुख्यतः भर देते. यासरख्या इंग्रजी भाषेतील पुस्तकांमध्ये पर्टीच्या इतिहासाची इतर माहिती मिळेल.


ब्लॅक पँथर पार्टी कशी होती?

ब्लॅक पँथर पार्टी पुरोगामी राजकीय संस्था होती. १७७६च्या क्रांती आणि नागरी युद्धापासून सामाजिक परिवर्तनासाठी सर्वात शक्तिशाली चळवळ, म्हणजे 'साठचे दशक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गतिमान काळातील अग्रमणी संस्था म्हणून ब्लॅक पँथर पार्टी उभी राहिली. अमेरिकेतील गुलामगिरी आणि दडपशाही विरोधी काळ्या संघर्षाच्या इतिहासात काळ्या संस्थांपैकी ही एकमेव सशस्त्र आणि क्रांतिकारक विषयपत्रिका जाहीर करणारी संस्था होती आणि समानता, न्याय आणि स्वातंत्र्य यासाठी काळ्या लोकांच्या समूहाच्या शेवटच्या मोठ्या जोरदार धक्क्याचे ही संस्था प्रतिनिधित्व करते.

पक्षाचे आदर्श आणि उपक्रम इतके क्रांतीकारक होते की एकदा यावर एफ. बी. आय. चे प्रमुख जे. एड्गर हूवर यांनी "अमेरिकेतील अंतर्गत सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका" अशी टिका केली. आणि, पार्टी संपुष्टात येऊनही, तिचा इतिहास आणि धडे इतके आव्हानात्मक आणि वादग्रस्त राहिले आहेत की प्रस्थापित ग्रंथ आणि माध्यमे अमेरिकेच्या इतिहासातून पक्षाचे सर्व संदर्भ मिटवू शकतील.

ब्लॅक पँथर पार्टी ह्यूई पी. न्यूटन यांच्या दृष्टीचे प्रकटीकरण होते. न्यूटन लूईसीअ‍ॅनाहून ओकलॅन्ड, कॅलिफोर्नीयाला स्थलांतरित केलेल्या कुटुंबातील सातवा मुलगा होता. १९६६ ऑक्टोबर महिन्यात काळे नेते मॅलकोम एक्स यांच्या खुनानंतर आणि वाट्स, कॅलिफोर्नीयामधील मोठे काळे शहरी बंड झाल्यावर आणि डॉ. मार्टिन लूथर किन्ग जूनियर यांच्या नेतृत्वात नागरी हक्काची चळवळ शिखरावर असताना, न्यूटन यांनी काही दीर्घकालीन मित्रांना एकत्र केले (बॉबी सील आणि डेविड हिल्लीआर्ड यांचा समावेश होता) आणि त्यांनी या संस्थेसाठी मूलभूत रूपरेषा विकसित केली. त्याचे मूळ नाव 'द ब्लॅक पँथर पार्टी फोर सॅल्फ डिफेन्स' होते. काळा पँथर प्रतीक म्हणून वापरला गेला कारण हे एक शक्तिशाली चित्र होते. हेच प्रतीक 'द लाऊन्डेस काऊन्टी (अलाबामा) फ्रीडम ओर्गनिजेशन' या नावाच्या अल्पायुषी मतदानाच्या हक्काच्या गटाने प्रभावीपणे वापरले होते. पक्षाचे तत्त्वज्ञान नागरी हक्काच्या चळवळीच्या प्रबळ अहिंसेच्या संकल्पानेमध्ये फरक दाखवायला आणि लुईझियानाचा 'डीकन्स फोर डीफेन्स' या नागरी हक्काच्या गटाला आदरांजली म्हणून 'स्वसंरक्षण' हा शब्द वापरला गेला. पण या दोन प्रतीकात्मक संदर्भांशिवाय ब्लॅक पँथर पार्टी आणि त्या वेळच्या काळ्या संस्थांमध्ये, म्हणजे इतर नागरी हक्काच्या आणि काळ्या शक्ती गटांमध्ये काही समानता नव्हती.

जन्माला येऊ घातलेल्या पक्षाच्या नेत्यांनी लगेच दहा मुद्द्यांची मूलतत्त्वे आणि उपक्रम तयार केले. ही मूलतत्त्वे आणि उपक्रमांनी अमेरिकेतील नागरी युद्धाच्या शेवटील गुलामगिरीचे निर्मूलन केले असूनही अजून समाजापासून दूर केलेल्या आणि अत्याचारित काळ्या जनतेच्या मूलभूत इच्छा आणि गरजा व्यक्त केल्या, आणि त्यांच्या दीर्घकालीन तक्रारींचे निराकरण करण्याचे आवाहन केले. याव्यतिरिक्त 'मूलतत्त्वे आणि उपक्रम' हा पार्टीचा जाहीरनामा होता. त्यातून स्वसंरक्षणाच्या हक्काची मागणी केली गेली आणि क्रांतिकारी विचारसरणीने आणि अमेरिकेतील त्यांच्या मूलभूत परिवर्तनाच्या योजनेला प्रोत्साहन देणे याला ब्लॅक पँथर पक्षाच्या सदस्यांच्या वचनबद्धतेने, लगेच काळ्या लोकांवरील अत्याचार नष्ट करण्याची आणि तातडीच्या गरजा भागवण्याची मागणी केली गेली.


पार्टीच्या स्थापनेचा ऐतिहासिक संदर्भ

अनेक शतके असलेल्या काळ्या लोकांच्या गुलामगिरीचा अंत होऊनही अमेरिकेच्या समाजात काळ्या लोकांचे एकीकरण झाले नाही, यात काहीच शंका नाही. खरेतर 'क्लू क्लक्स क्लॅन'चा उदय प्रकट असलेल्या, अध्यक्षांच्या आणि काँग्रेसच्या सौम्य दुर्लक्षाने मान्यता दिलेल्या, तथाकथित 'ब्लॅक कोड्स'मध्ये संस्था केलेल्या हिंसक गोऱ्यांच्या मुक्तीविरुद्ध प्रतिक्रिया झाल्या. सर्रासपणे जमावाने काळ्या लोकांची हत्या करणे आणि याबरोबर काळ्या लोकांच्या अधिकारांचा प्रत्यक्षात नकार करणे (मतदानाचा, उपासना करण्याचा आणि सार्वजनिक सुविधा वापरण्याचा अधिकार यांचा समावेश) ही अमेरिकेत जीवनशैली बनली.

यानंतर अमेरिकेत जगण्यासाठी काळ्या लोकांना तीव्र संघर्ष करावा लागला. त्यांनी समाजातील पूर्ण, प्रथम श्रेणीचे नागरिक म्हणून काळ्या लोकांच्या एकत्रीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 'एन ए ए सी पी' (नॅशनल असोसिएशन फॉर द अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल) या नावाची संस्था स्थापन केली आणि त्याच वेळी त्यांनी काळ्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आफ्रिका परतीला प्रोत्साहन देण्यासाठी मार्कस गार्वी यांची 'यू एन आई ए' (युनिव्हर्सल नीग्रो इंप्रुवमेन्ट असोसिएशन) या नावाची संस्था स्थापन केली. त्याच वेळी काळ्या लोकांसाठी वेगळी सामाजिक-आर्थिक योजना स्थापन करण्यासाठी माजी गुलाम बुकर टी वाशिंटन यांचे प्रभावी प्रयत्न झाले. अशा सर्व प्रयत्नांना अमेरिकेचा प्रतिसाद हिंसक आणि अत्याचारी होता आणि तो बेदरकारपणे चालू राहिला. म्हणून पुढील अर्ध्या शतकासाठी निर्दयी हिंसा आणि कायद्याचा विलंब याच्याविरुद्ध काळ्या लोकांचा जनउद्रोह असूनही, जगण्याचा काही मार्ग मिळवण्यासाठी काळ्या लोकांच्या शांत विनंत्या असूनही, आणि अमेरिकेतील स्वतंत्र जीवन जगणे किंवा अमेरिका सोडणे या प्रकारचे काळ्या लोकांचे ठळक प्रयत्न असूनही, बहुतांश काळ्या लोकांना त्यांचे स्वतःचे सामाजिक-आर्थिक स्वातंत्र्य प्रस्थापित करणे किंवा मोठ्या समाजात पूर्णपणे भाग घेणे यासाठी प्रत्येक शक्य मार्ग नकारला गेला.

‘प्लॅसी' या नावाच्या खटल्याच्या ६० वर्षांनंतरही खूप कमी दिलासा मिळाला, म्हणजे १९५४ च्या 'ब्राऊन विरुद्ध बोर्ड आॅफ एजूकेशन' नावाच्या खटल्यामधील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की (निदान सार्वजनिक शिक्षणाबाबत) अमेरिकेतील काळ्या लोकांसाठी 'वेगळे' म्हणजे 'समान नाही'. १९९४ साली काळे मानसशास्त्रज्ञ डॉ. केनिथ क्लार्क (यांच्या अभ्यासाच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने 'ब्राऊन'बद्दल निष्कर्ष काढले की ‘वेगळे, पण समान' या सिद्धांताचा काळ्या मुलांवर नकारात्मक परिणाम होतो) यांनी नोंद घेतली की १९५४ च्या काळापेक्षा (म्हणजे 'ब्राऊन' निर्णयाच्या काळापेक्षा) १९९४ मध्ये अमेरिकेच्या शाळा अधिक विभक्त आहेत, हे उल्लेखनीय आहे.

‘ब्राऊन' खटल्यानंतरही, काळ्या लोकांनी एकत्रिकरण करायला आणि अमेरिकेच्या समाजात पूर्ण सहभागी व्यायला संघर्ष केला, पण काही उपयोग झाला नाही. १९५५ च्या मांटगमोरी (अॅलबॅमा) बसवर बहिषकारापासून त्यानंतरच्या मतदार हक्काच्या प्रयत्नांपर्यंत आणि ‘एस. एन. सी. सी.’ (‘स्टूडेन्ट नॉनव्हायलेन्ट कोओर्डिनेटिन्ग कमिटी) याच्या नेतृत्वात पूर्ण गोऱ्या सार्वजनिक सुविधांमधील धोकादायक सत्याग्रहापर्यंत, नगरी हक्कांच्या चळवळीने अमेरिकेला आव्हान दिले. डॉ. मार्टिन लूथर किन्ग जूनियर यांच्या धार्मिक मार्गदर्शन आणि अहिंसक तत्त्वज्ञानाखाली लाखो काळ्या आणि गोऱ्या लोकांनी अमेरिकेच्या काळ्या अल्पसंख्याकाच्या मुक्ती आणि न्यायासाठी निषेध केला आणि मोर्चे काढले, तर वाटेत अनेक लोकांची हत्या झाली किंवा आयुष्यभरासाठी गंभीर जखमी झाले. शेवटी, १९६४ साली अमेरिकेच्या काँग्रेसने सार्वजनिक सुविधांमधील वांशिक भेद बेकायदेशीर ठारवणारा नागरी हक्काचा कायदा केला.

पण हा कायदा खूप अपुरा होता आणि खूप उशिरा आला. फक्त सामाजिक अन्यायाविरुद्ध निषेध करण्यासाठी अहिंसक काळे लोक आणि इतर नागरी हक्क कार्यकर्ते आणि निदर्शकांवर पोलिसांकडून पाण्याचे फवारे उडवले गेले आणि मारले गेले, त्यांच्यावर थुंकले गेले, तुरूंगात टाकले गेले, आणि याची चित्रे अमेरिकेच्या टीव्ही पडद्यावर झळकत असताना (अमेरिकेच्या आयुष्यात आणि लोकप्रिय संस्कृतीत नवी आणि आकर्षक घटना), तरुण शहरी काळ्या लोकांनी अहिंसा नाकारली. याचा कळस म्हणजे वाट्स (लास अॅगेलिस), कॅलिफोर्नीअमधील काळ्या माणसाच्या क्रूर पोलिस मारहाणीविरुद्ध हिंसक उद्रेक. या १९६५च्या बंडाने अमेरिकेला धक्का बसला आणि अशा प्रकारच्या अत्याचाराविरुद्ध प्रतिसादांना प्रेरणा दिली. १९६७ पर्यंत देशभरातील शहरांमध्ये १०० पेक्षा जास्त मोठे काळे शहरी बंड झाले. त्याच कालावधीत १९६५ साली व्हिएतनाम युद्ध सुरू झाले. टीव्ही वृत्तांमधून युद्धाचे भयानक वास्तव उघडकीला आले की अमेरिकेचे 'चांगले' सैनिक व्हिएतनामी मुलांना मारत होते, आणि अमेरिकेच्या गोऱ्या तरुण लोकांनी प्रश्न उपस्थित केले आणि युद्धाच्या विरोधात मोर्चा काढला. अमेरिकेचे काळे आणि गोरे तरुण लोक प्रस्थापित व्यवस्थेला उघडपणे प्रतिकूल झाले होते.


ब्लॅक पँथर पार्टीचा उदय

या पार्श्वभूमीवर ह्यूई पी. नूटन 'द ब्लॅक पँथर पार्टी फॉर सेल्फ डिफेन्स' संघटित करत होते. त्यांनी काळ्या लोकांवरील सर्व प्रकारच्या अत्याचारांची संपूर्ण निर्मूलनाची धैर्याने मागणी केली आणि पर्याय म्हणून क्रांती मांडली. त्याच वेळी ब्लॅक पँथर पार्टीने ही भूमिका घेतली की अमेरिकेतील काळे लोक आणि व्हिएतनामी लोक शस्त्रधारी कॉमरेड म्हणून एकाच शत्रू (अमेरिकेचे सरकार) याच्याविरुद्ध संघर्ष करत होते. यात सर्वात 'धोकादायक' हे होते की तरुण काळे लोक जे काचेच्या बाटल्या पेटवून अमेरिकेवर फेकत होते, ते ऐकतही होते.

१९६७ मे महिन्यात जेव्हा बॉबी सील यांच्या नेतृत्वाखाली ब्लॅक पँथर पक्षाच्या पूर्णपणे सशस्त्र असलेल्या सदस्यांच्या छोट्या गटाने कॅलिफोर्नीअ लोक सभेवर कूच केले तेव्हा हा संदेश दूरवर पसरला. पार्टीला लक्ष्य केलेला प्रलंबित बंदुक नियंत्रण कायदा (जो 'मलफोर्ड अ‍ॅक्ट' झाला) त्याच्या विरुद्ध हे कूच होते. काळ्या लोकांना शस्त्रे धारण करण्याचा घटनात्मक अधिकार आहे, ही भूमिका घेऊन पार्टीने या दिवशी तरुण काळ्या लोकांना रणशिंग फुंकण्याचा संदेश दिला.

म्हणून १९६७ ऑक्टोबर महिन्यात पश्चिम ओकलॅन्डच्या रस्त्यावर पोलिस अधिकारी जॉन फ्राई याच्या मृत्युला कारणीभूत झालेल्या एक प्रकारच्या बंदुक लढाईनंतर जेव्हा ह्यूई नूटन यांना गोळ्या लागल्या, अटक करण्यात आली, आणि गोऱ्या ओकलॅन्ड पोलिसाचा खून दाखल करण्यात आला, तेव्हा खरेतर ठिणगीने वणवा पेटवला. व्हिएतनाम युद्धामुळे रागवलेल्या आणि अपेक्षाभंग झालेल्या अमेरिकेच्या तरूण गोऱ्या लोकांनी तरूण शहरी काळ्या लोकांसह आवाज उठवला आणि ऐक्यात ते ओरडले 'ह्यूई यांना मुक्त करा'!

श्रीमंत आणि गरीब, समाविष्ट केलेले आणि वगळलेले, परके आणि विशेषाधिकारप्राप्त वगैरे अशा सर्व सामाजिक अंतर्विरोधांचे मूर्त स्वरूप बनले आणि चळवळीचे रूप घेतले. गोऱ्या पोलिसाचा खून केल्याचा आरोप असलेल्या, दडपलेल्या पण दडपशाहीचा प्रतिकार केलेल्या काळ्या माणसाला मुक्त करणे हे सर्वांना मुक्त करण्याच्या बरोबरीचे होते.

याचा एक परिणाम होता की केवळ पक्षाचा बहर नव्हे तर इतर समविचारी संस्थांचा वेगवान प्रसार झाला. दक्षिण कॅलिफोर्नीयामधील मेक्सिकन अमेरिकन लोक उर्फ चिकानोस यांनी 'ब्राऊन बरेज' या नावाची संस्था स्थापन केली. शिकागोमधील आणि शिकागोभोवतील गोऱ्या लोकांनी 'व्हाईट पेट्रिअट पार्टी' या नावाची संस्था स्थापन केली. सॅन फ्रान्सिस्को खाडीच्या भोवतीच्या प्रदेशातील चीनी लोकांनी 'रेड गार्ड' या नावाची संस्था स्थापन केली. न्यूयॉर्कमधील पोर्टो रिकन लोकांनी 'यंग लोर्ड्स' या नावाची संस्था स्थापन केली. अखेरीस वृद्धांविरुद्ध मानवी आणि नागरी हक्कांच्या उल्लंघनांचे निवारण करण्यासाठी तथाकथित ज्येष्ठ नागरिकांच्या गटाने 'ग्रे पँथर्स' या नावाची संस्था स्थापन केली. पार्टी ओकलॅन्ड मधील छोट्या संस्थेतून राष्ट्रीय संघटनेत वाढली आणि ४८ राज्यात तरूण काळ्या लोकांनी पक्षाच्या शाखा स्थापन केल्या. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर जपान, चीन, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, स्वीडन, मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, उरुग्वे इत्यादी या सर्व देशांमध्येच नव्हे तर इस्रायलमध्येही ब्लॅक पँथर युती आणि समर्थन गट उगवू लागले.

स्थानिक स्तरावर काळ्या आणि गरीब लोकांना आवश्यक सेवा प्रदान करण्यासाठी पार्टी सामाजिक योजनांची मालिका विकासित करू लागली आणि त्याच वेळी त्याद्वारे पर्यायी, अधिक मानवीय सामाजिक व्यवस्थेच्या आदर्शांना पार्टीने प्रोत्साहन दिले. या योजनांची एकूण संख्या ३५पेक्षा जास्त होती आणि त्यांना अखेरीस 'जिवन सुविधा पुरवणाऱ्या योजना' (इंग्रजीत: ‘सर्वईवल प्रोग्रॅम्स') असे म्हटले गेले आणि 'क्रांती प्रलंबित जगणे' या घोषणेखाली पार्टीच्या सदस्यांकडून चालवले गेले.

अशी पहिली योजना 'मुलांसाठी विनामूल्य न्याहरी योजना' होती. सॅन फ्रान्सिस्कोच्या 'फिलमोर' या भागातील एका छोट्या कॅथोलिक चर्चमध्ये चालवण्यापासून अमेरिकेतील प्रत्येक मोठ्या शहरात जिथे पक्षाची शाखा होती तिथे चालेपर्यंत योजना वाढली. दररोज या योजनेअंतर्गत पर्टीकडून हजारो गरीब आणि भुकेल्या मुलांना विनामूल्य न्याहरी देण्यात आली. या योजनेची व्याप्ती आणि प्रभावी परिणाम इतका मोठा होता की केंद्र सरकारला लाज वाटली आणि त्यांना देशभर सर्वजानिक शाळांसाठी समान योजना सुरू करावी लागली. दरम्यान, एफ. बी. आय.ने पार्टीच्या विनामूल्य न्याहरी योजनेवर टीका केली की पार्टीच्या 'कम्युनिस्ट' कामे पार पाडण्यासाठी ही योजना फक्त प्रचाराचे साधन होते. अधिक कपटीपणे एफ. बी. आय.ने स्वतःच पार्टीचा असा निषेध केला की तो अमेरिकेचे सरकार उलथून टाकण्याचे वेड लागलेल्या कम्युनिस्ट गुंडांचा गट होता.

ती व्याख्या आणि केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा या दोन्हींनी सज्ज असलेल्या जे. एड्गर हूवर यांनी एफ. बी. आय.ला हे निर्देश दिले की ब्लॅक पँथर पार्टी पूर्णपणे काढून टाकण्याची मोहीम करावी, आणि हे करण्यासाठी स्थानिक पोलिस विभागांना मदतीसाठी आदेश द्यावा. खरेतर १९६८ साली हूवर यांनी असे संगितले होते की पार्टी "अमेरिकेतील अंतर्गत सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका" होता आणि असे आश्वासन दिले की १९६९ हे वर्ष पार्टीच्या अस्तित्वाचे अंतिम वर्ष असेल. १९६९ जानेवारी माहिन्यात 'यू. सी. एल. ए.’ या नावाच्या विद्यापीठाच्या परिसारत काळे राष्ट्रवादी रान करेन्गा आणि त्यांची 'अस ओर्गानिजेशन' या संस्थेच्या सहकार्याने एफ. बी. आय.ने सुपारी दिलेल्या मारेकऱ्यांनी जॉन हगिन्स आणि अॅलप्रेन्टिस 'बंची' कार्टर या दोन पार्टीच्या दक्षिण कॅलिफोर्नीयाच्या शाखेच्या पुढाऱ्यांची हत्या केली. या वर्षाच्या शेवटपर्यंत, पोलिस किंवा एफ. बी. आय. यांनी ब्लॅक पँथर पार्टीच्या जवळपास प्रत्येक कार्यालयावर आणि इतर ठिकाणांवर हिंसक हल्ला केला. डिसेंबर महिन्यात याचा कळस म्हणजे लॉस अॅगेलिसमधील पार्टीच्या कार्यालयावर एफ. बी. आय.ने रचलेला पाच तासांचा पोलिस हल्ला केला आणि एफ. बी. आय.च्या निर्देशावार इलिनोई राज्य पोलिसांनी शिकागो पार्टी पुढारी फ्रेड हॅंपटन आणि सदस्य मार्क क्लार्क यांची हत्या केली.

मध्यंतरी १९६८ एप्रिल महिन्यात ओकलॅन्ड पोलिसांनी १७ वर्षांचा पार्टीचा सदस्य बॉबी हट्टन याची हत्या केली; १९६८ ऑगस्ट महिन्यात लॉस अॅगेलिस पोलिसांनी रॉबर्ट लॉरेन्स आणि स्टीव बार्थालाम्यू यासह इतर १७ वर्षांचा पँथर थॉम्मी ल्यूविस यांची हत्या केली; शिकागोमधील १९६८ साली डेमोक्राटिक पार्टीच्या अधिवेशनामधील युद्धविरोधी निषेधासंबंधित कटाचा आरोप या आधारावर पार्टीचे अध्यक्ष बॉबी सील यांच्या अटकेपासून, एप्रिल १९६८ची पोलिस चकमक ज्यामध्ये बॉबी हुट्टन मारला गेला त्यासंबंधीत पोलिसांवर हल्ला करण्याच्या आरोपाच्या आधारावर कर्मचारी प्रमुख डेविड हिल्लिअर्ड यांच्या अटकेपर्यंत, आणि युद्धविरोधी भाषणातून अमेरिकेच्या अध्यक्ष निक्सन यांच्या हत्येचा कट रचण्याच्या आरोपापर्यंत, आणि बॉबी सील आणि अनुभवी पँथर एरिका हुगिन्स यांच्या न्यू हेवन मधील प्रसिद्ध कटाच्या खटल्यापर्यंत, अनेक अटका झाल्या. पार्टीच्या सामाजिक योजनांवर सर्व प्रकारचे हल्ले झाले आणि पार्टीची मालमत्ता नष्ट करण्यात आली. चर्चवर आक्रमण करणाऱ्या आणि 'न्याहरी योजने'ची अंडी चर्चच्या फरशीवर फोडणाऱ्या पोलिसी हल्लेखोरांपासून पार्टीच्या मोफत दवाखान्याच्या वस्तू पायाखाली चिरडणाऱ्या पोलिसापर्यंत आणि पार्टीची अनेक वृत्तपत्रे नष्ट करणाऱ्या पोलिसांपर्यंत. याव्यतिरिक्त पार्टीचे समर्थन कमकुवत करण्यासाठी आणि पर्टीच्या समर्थक आणि कुटुंबातील सदस्यांच्या वचनबद्धतेचा भंग करण्यासाठी आणि त्यांच्या उत्साह मोडून काढण्यासाठी धमकी आणि असे इतर डावपेच वापरले गेले. एफ. बी. आय. च्या 'कोइंटेलप्रो' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथाकथित 'कऊंटर इंटेलिगेन्स' योजनेखाली जे उपक्रम राबविले गेले ते अधिक भयावह पण छुपे होते. त्याद्वारे क्षेत्रीय कार्यालयांना आणि स्थानिक पोलिस विभागांना माहिती देणारे आणि चिथावणी देणारे लोक वापरून, अंधाधुंदी माजवून आणि हत्या अशा गुप्त उपक्रमांनी, पार्टीला नष्ट करण्याचे आदेश एफ. बी. आय. ने दिले.

हे सर्व असूनही पार्टी बचावली आणि तिचे 'जगण्याचे कार्यक्रम' तयार करत राहिली. शेवटी यात फक्त विनामूल्य न्याहरी योजना आणि दवाखानेच नव्हे तर धान्य देणे, विनामूल्य बुटांचे उत्पादन आणि वितरण, शाळा आणि शिक्षण योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहतूक आणि सेवा योजना, कैद्यांना भेटायला मोफत बस सेवा, कैद्यांना समर्थन आणि कायदेशीर मदत योजना, इत्यादी उपक्रम समाविष्ट होते.


'ह्यूई मुक्ती' चळवळ आणि पार्टीची वाढ

'ह्यूई मुक्ती आंदोलन' असे संबोधले गेलेल्या चळवळीच्या समर्थनार्थ ओकलॅन्डमध्ये आणि संपूर्ण अमेरिकेत लाखो काळे तरुण गोऱ्या तरुणांसह रस्त्यावर उतरले. शेवटी ह्यूई यांना दोषी ठरवण्यात आले पण मूळ 'निर्घृण हत्या' (इंग्रजीत: फुर्स्ट दग्री मुर्डर) या आरोपावर नाही, फक्त 'साधी क्रूरहत्या' (इंग्रजीत: सिंपल मॅनस्लाऊटर) या आरोपावर. पण त्यानंतर लवकरच हा निर्णयही फेटाळण्यात आला आणि नव्या सुनावाणीचा आदेश देण्यात आला. मग १९७० जुलै महिन्यात ह्यूई यांना तुरूंगातून मुक्त करण्यात आले. हजारो लोकांनी त्यांचे स्वागत केले.

पण १९७०, ७ जुलै रोजी १७ वर्षांचा मुलगा जॉनथन जॅक्सन (जोर्ज जॅक्सनचा भाऊ) याच्या खुनामुळे अँजला डेविस यांची प्रसिद्ध अटक आणि खटल्याच्या पर्श्वभूमीवर हा उत्सव निरर्थक ठरला. जेव्हा अल्जेरियामध्ये राहणाऱ्या प्रसिद्ध हद्दपार पार्टी पुढारी एलड्रिज क्लीवर यांनी पार्टीच्या सामाजिक योजनांना आव्हान दिले आणि याऐवजी दहशतवादी कारवायांचा प्रस्ताव दिला तेव्हा ह्यूई यांच्या मुक्तीचा प्रश्न जवळजवळ विसरला गेला. १९७० वर्षाच्या आखेरीस एका घाणेरड्या भांडणाचा कळस पार्टीशी निष्ठावंत असलेल्या सॅम नेपिअर यांच्या हत्येत झाला. त्यावरुन क्लीवर यांना पार्टीतून काढून टाकण्यात आले. तरीही पार्टी आपल्या योजना तयार करत राहिली आणि अंमलबजावणी करत राहिली आणि तिच्या मूळ ठिकाणी म्हणजे ओकलॅन्ड, कॅलिफोर्नीयामध्ये ती तिचे प्रयत्न दृढ करू लागली.

पुढील काही वर्षांमध्ये १९७३ वर्षापर्यंत, १९७१ ऑगस्ट महिन्यात पार्टीचे फील्ड मार्शल आणि लेखक जोर्ज जॅक्सन यांची हत्या होऊनही पार्टीने आपले कार्य कायम ठेवले आणि वाढवले. १९७२ साली ओकलॅन्डमध्ये बॉबी सील आणि इलेन ब्राऊन यांच्या उमेदवारीने (अनुक्रमे महापौर आणि नगरसेविका) पार्टीने निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला. निवडणुकीत पराभूत होऊनही ब्लॅक पँथर पार्टी भविष्यातील प्रयत्नांसाठी समर्थनाचा विस्तृत पाया मजबूत करू शकली. १९७४ साली पार्टीच्या अंतर्गत बाबींमध्ये इतकी मोठी उलथापालथ झाली की जेव्हापर्यंत ह्यूई नूटन तरुण वेश्येच्या हत्येच्या खटल्यात (ज्यात शेवटी ह्यूई यांना निर्दोष ठरवण्यात आले) न्यायालयात जाण्याऐवजी फरार झाले तेव्हापर्यंत बहुतांश मूळ नेतृत्व गेले होते. डेविड हिल्लीआर्ड तुरुंगात होते तेव्हा त्यांना पार्टीतून काढून टाकण्यात आले. बॉबी सील यांनाही काढून टाकण्यात आले. क्युबामध्ये तीन वर्षे नूटन हद्दपार असताना इलेन ब्राऊन यांनी पार्टीचे अध्यक्षपद स्वीकारले.


शेवटचे प्रकरण

या काळात ब्राऊन यांनी पुन्हा ओकलॅन्डमधील निवडणूक लढवली आणि त्यांना ४४ टक्क्यांपेक्षा जास्त मते, प्रत्येक कामगार संघटनेच्या समर्थनासह, मिळाली. पुढील शहर निवडणुकीत ओकलॅन्डमधील महापौर पदासाठी पार्टीने लईअनेल विल्सन यांचे समर्थन केले आणि यांना महापौर म्हणून पार्टीने जवळजवळ बसवले. या शहराच्या १०० वर्षांच्या इतिहासात ते पद धारण करणारे पहिले काळे व्यक्ती. दरम्यान स्थानिक महामार्गामुळे विस्थापित झालेल्या गरीब लोकांसाठी ३०० नवी बदली घरे बांधायला लागणाऱ्या निधीसाठी लढा देऊन आणि तो मिळवून आणि ओकलॅन्डमधील गरीब आणि बेरोजगार लोकांना १०,००० नवीन रोजगार पुरवायला आणि शहराचा जीर्ण भाग विकासित करायला काही विकसकांसह भागीदारी करून, पर्टीने आपला पाया आणखी मजबूत केला. त्याच वेळी एका कायमस्वरुपी प्राथमिक शाळेची स्थापना झाली. कॅलिफोर्नीयाच्या लोक सभेने आणि इतरांनी याचे खूप कौतुक केले. मग १९७७ साली ह्यूई हद्दपारीहून परत आले तेव्हा ओकलॅन्ड, कॅलिफोर्नीयामध्ये ब्लॅक पँथर पार्टी कर्यारत आणि चांगली होती. पार्टीने काळ्या आणि कामगार समाजात मजबूत मतदारसंघ राखला होता आणि तिचे प्राथमिक ध्येय, म्हणजे अमेरिकेतील क्रांतीसाठी ओकलॅन्डला पाया बनवणे, यासाठी पुढे जाण्यासाठी सज्ज होती.

परंतु १९७७ जुलै महिन्यात नूटन ओकलॅन्डला परतल्यानंतर लवकरच, जे. एड्गर हूवर यांचा १९७२ साली मृत्यू होऊनही, एफ. बी. आय.चे सतत पण अधिक छुपे आणि अत्याधुनिक उपक्रम आणि अंतर्गत ताण आणि संघर्ष यामुळे ब्लॅक पँथर पार्टी कमकुवत होऊ लागली. दशकाच्या शेवटापर्यंत पार्टीचे संथ आणि दुर्लक्षित निधन झाले.