पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाची सुरूवात दिल्लीची उच्च प्रदूषण पातळी आणि दिल्लीतील आशचर्यकारक हिरवळ हा विरोधाभास मांडणाऱ्या एका विस्तृत लेखाने होते. मग या प्रकरणात पुस्तकाचे मुख्य विषय आणि युक्तिवाद मांडले आहेत: दिल्लीच्या इतिहासासाठी रिजचे महत्त्व; दिल्लीच्या पर्यावरणीय आणि सामाजिक भूतकाळाचा जिवंतपणा आणि क्लिष्टता; आणि जागतिक पर्यावरणीय संकटाच्या काळात रिजचे महत्त्व.

योडा प्रेस/सेज सिलेक्ट यांच्याकडे या प्रकरणाचा एक भाग विनामूल्य पी.डी.एफ रुपात उपलब्ध आहे.

प्रकरणाचे विभाग आणि त्यांच्यासह या प्रकरणात समाविष्ट कालावधी आणि ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत. (विशेष टिप्पणी: या चित्राची निर्मिती ते पुस्तकाचे अंतिम प्रकाशन या काळात काही बदल आणि पुनर्रचना झाली आहे.)