या प्रकरणात रिजचा भूशास्त्रीय इतिहास मांडला आहे. सर्वात मूलभूत स्तरावर रिज नावाप्रमाणेच भूशास्त्रीय आहे आणि या दगडी पायावर दिल्लीचे अनेक थर बांधले गेले आहेत. दीड अब्ज वर्षांपुर्वीच्या रिजच्या निर्मितीपासून वहासतीनंतरच्या दगडी खाण कामगांराच्या संघर्षापर्यंत आणि रिजचे रॉक क्लाइंबिंग आणि अभिजनांच्या मनोरंजनासाठीच्या क्षेत्रामध्ये रूपांतरापर्यंत (खालील चलचित्रात सूचित केल्याप्रमाणे) या प्रकरणात रिजच्या पाषाणाचा मोठा प्रवास दाखवला आहे.



प्रकरणाचे विभाग आणि त्यांच्यासह या प्रकरणात समाविष्ट कालावधी आणि ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत. (विशेष टिप्पणी: या चित्राची निर्मिती ते पुस्तकाचे अंतिम प्रकाशन या काळात काही बदल आणि पुनर्रचना झाली आहे.)